वाचन संस्कृती जपायला हवी...
वाचन संस्कृती जपायला हवी...
पुस्तके जीवन आणि जीवनाचे गणित शिकवीती
आम्हा ही त्यासाठी काढाया हवी फुरसती
★वाचन संस्कृती जपायला हवी...
★वाचनाची गोडी राखायला हवी...
नको नुसतेच वरवरचे वाचन
वाचनातून काहीतरी शिकायलाही हवे
★वाचन संस्कृती जपायला हवी...
★वाचनाची गोडी राखायला हवी...
म्हणती वेळ नाही कोणाकडे हाती पुस्तक धराया
किती उदाहरणे देऊ जीवन ज्यांचे पुस्तकांनी घडलंया
★वाचन संस्कृती जपायला हवी...
★वाचनाची गोडी राखायला हवी...
वाचून तर बघा, मिळेल पुस्तकांतूनच ज्ञान
वाचाल तर नक्कीच मिळवाल मान-सन्मान
★वाचन संस्कृती जपायला हवी...
★वाचनाची गोडी राखायला हवी...
चला तर पुस्तकांची कास धरू नि वाचक होऊ
वारसा हा आपला आपणच पुढे नेऊ.....
★वाचन संस्कृती जपायला हवी...
★वाचनाची गोडी राखायला हवी...
