उतू जाऊ नये म्हणून...
उतू जाऊ नये म्हणून...
पाझरतोय चंद्र
आज पुन्हा
पिकावर करपल्या,
आणि आभाळ
सरकत चाललेय
सागराकडे उधानलेल्या
मी मात्र,
घातलाय हात पुन्हा एकदा
हवामान खात्याच्या
जादुई पोतडीत
बघत चंद्राकडे
आटत्या दुधात बुडत जाणाऱ्या
लागलाच हाती एखादा ओला ढग
आणि नाहीच चुकला त्याचा अंदाज
बरसण्याचा
तर करीलही पेरणी कदाचित
हंगामहीन नात्यांची
कोजागिरीच्या जाग्या रात्री
तसेही झोपण्याचे अंदाज
कुठे खरे ठताहेत आजकाल
मात्र अबाधित आहे
चंद्राची आवकजावक
आणि उधानही सागराचे
अखेर मला फिरवावीच लागेल पळी
दुधात उकळत्या
पुन्हा एकदा,
उतू जाऊ नये म्हणून...
