STORYMIRROR

vaishali vartak

Tragedy

2  

vaishali vartak

Tragedy

उसवलेले नाते

उसवलेले नाते

1 min
61

नाते रेशीम बंधनाचे 

रममाण मस्त दोघात

प्रेमाची साथ एकमेकांना

जणू दोघेच या विश्वात      


मनी आदर अपार      

मी तू पणाचा अभाव      

घट्ट विणलेल्या नात्याला      

का उसवावे ?


ना लागे ठाव मने जुळली

तरी जपावे स्वत्व मनात

अतीदक्षता घेता उसवेना

त्याची वीण क्षणात        


उसवत जाती मनाचे धागे        

सुंदर नाते बंध तुटत        

विसरले सुखद ते क्षण        

प्रेमच खोटे, जगणे कुढत


वाटते तितके नसे सोपे

सामंजस्याची असते गरज 

मग, दोन जीव एकत्र येता

उसवणार नाही नाते सहज


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy