उन्हामध्ये शतपावली
उन्हामध्ये शतपावली
कितीदा सांगायच असतं तुला
माथ्यावर सुर्य आल्यावर
जरा सावलीत येत जा..!
सारखं उन्हात हिंडत असतो
पायांना चटके लागतं...
पण आजीची नजर आड करून
उन्हात शतपावलीसाठी निघालो आहे...!!धृ.!!
गावापासून कितीतरी मैल दूर आलो
बंध मुक्त मनाने
डोंगराच्या पायथ्याशी घरे
दिसेनासे झाले आहेत..!
गगनांत आगीचा गोळा
जळताना दिसत आहे
समोर ओसाड रान
ना हिरवळ,ना पाण्याचा थेंब
आणि कपाळावर मिठाची
नदी सुरू झाली आहे..!!1!!
चालता चालता
आंबराई मध्ये आलो
मोहर ला बघुन
नकळत जिभेवर
आंबटपणा आलं..!
तोंडाला पाणी सुटले आहे
दगड शोधत आहे
पण विंचु सोबत खेळ
सुरू झाला आहे....!!2!!
संध्या ला घराची
वाट बघत आहे
त्या गायी-वासरा
सोबत आईची ओढ लागली..!
पश्चिमेचा घराकडे भास्करा
सोनेरी किरणांनी सजला आहे
आणि मी ओठ पुटपुटत,
पायांना हळूच काठीने मारत
माझ्या घराकडे परत जात आहे..!!3!!
