STORYMIRROR

vaishali vartak

Classics Fantasy Inspirational

4  

vaishali vartak

Classics Fantasy Inspirational

उगवला रविवार

उगवला रविवार

1 min
399

वाट पहाती लोचने

कधी येणार सुखाचा

मस्त लोळत पडावे

दिन वाटे आनंदाचा


नसे आज धावपळ

उठा आज आरामात

नको पहाणे घड्याळ

सारे कसे निवांतात


 असे रजेचे रंजन

भोजनात काही खास

आवडीने बनविता

दरवळे खमंग वास


जणु हक्काची मानती

वामकुक्षी वाटे हवी

सात दिन धावण्यास

स्फूर्ती मनी देण्या नवी


 सूर एकूण रजेचा

शिणलेल्या त्या मनाला

मिळे जरा विरंगुळा

देई मोद तो जीवाला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics