उगीच मी मिश्कील हसले
उगीच मी मिश्कील हसले
एकांताचे क्षण घालूनिया सोबत
आठवणी गेलेले क्षण बघुनी
भिजले डोळे तुझे नि माझे
तुझी नजर चोरत उगीच मी मिश्कील हसले
एकांतात रमले सोबत घेऊन या प्रेमाचे क्षण
वेदनाही विसरुनी तुझ्यात मी रमले
स्वप्न माझे तुला सांगून मी तुझी होऊन जगले
तुझी नजर चोरत उगीच मी मिश्कील हसले
तुझ्या मिठीत शिरताच तुझ्या डोळ्यात सजले
कशी सावरू मी स्वतःला शब्द अबोल झाले
क्षितिजाच्या पार तारले विरले स्वप्न माझे
तुझी नजर चोरत उगीच मी मिश्कील हसले

