STORYMIRROR

प्रविण कावणकर

Romance Action

3  

प्रविण कावणकर

Romance Action

उभ्या जगाचा पोशिंदा

उभ्या जगाचा पोशिंदा

1 min
204

शेतकरी बाप माझा

उभ्या जगाचा पोशिंदा

भाकर तुकडा घेवून

दिवस रात्र कामधंदा


मुठभर धान्य पेरून

रोपांची लागण करतो

बैलजोडी शेतात शोभून

मशागत मळणी करतो


हिरवेगार शेतात पिक

बहरुन पिकवला मळा

शेतकरी राज्याने घाम

गाळून सोसल्या कळा


शिवार फुललं कोवळे

अंकुर दाटले उराशी

शेतकरी राजा माझा

स्वप्नं बाळगतो मनाशी


शेतात राबून कुटुंबाला

देई सुखाचे दोन घास

माझा जगाचा पोशिंदा

सौरक्षणाचा घेतो ध्यास


लाखो दिलाचा पोशिंदा

आम्हा तुझा अभिमान

जगाच्या तुलनेत सारे

मिळून संस्कृतीची शान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance