त्या वळणावर
त्या वळणावर
त्या वळणावर मनाची पाखरं
उडून सुगंध मनी दरवळते
युवती तारूण्यातली देखणी
आरस्यात पाहूनी लाजते.
ती रूपाची रानी तो दिसला स्वप्नी
जागत्या डोळ्यात छवी निरखते
आयुष्याच्या त्या वळणावरती
जणू वाऱ्यासोबतही ती बोलते.
त्या भावविश्वात कातरवेळी
ह्रदयात झरती त्या आठवणी
फुलपाखरा सम मधुरस्रावणी
नजर भीरभीरतसे मनोमनी..
जन्म मरनाच्या आनाभाका
आकांक्षेच्या या क्षितिजाखाली
अश्या धुंद एका सांजवेळी
नजरानजर होवूनी समर्पक झाली.
क्षणात वाहीले हे सारे जीवन
संगतीला हे नव भोळे श्रावण
गरजतो मेघाविणा नंभांगन
त्यागातून ती करे मनाचे सांत्वन.

