त्या फुलाने
त्या फुलाने
रेशमी केसात माझ्या फुल त्याने खोविले
त्या फुलाने या फुलाला भ्रमरापाशी पाहिले
धुंद प्रीतीचे नाजुक नाते क्षण मोहाचे असेच देते
लाजरीची रोप झाले अंग चोरून घेतले (१)
कोमल माझ्या तनुलतेवर हर्षफुलांचे झरले अत्तर
क्षणभरी रोमांचले मी आणि त्याची जाहले (२)
किमया केली कशी फुलाने समीप आणिली दोन जीवने
वेणीतील त्या फुलात वेडे मन माझे गुंतले (३)