तूझ्या माझ्या प्रेमाचा काळ
तूझ्या माझ्या प्रेमाचा काळ
तुझ्या माझ्या प्रेमाचा
काळ किती न्यारा होता
वही कागदावरच्या लेखणीचा
भार किती प्यारा होता
आपलं love म्हणजे ना
watsup ना फ़ेसबुक
फक्त लाल निळी पेनं
आणि सिंगल लाईन नोटबुक
तुझ्या माझ्या प्रेमात ना
फोन ना दूरध्वनी केंद्र
आपले मित्रच होते की
आपले आकाशवाणी केंद्र
ना तू पाठवली इमेज
ना मी गेलो कधी थेटरात
माझ्या मनातलं सारं मी
तुला लिहत होतो लेटरात
आपल प्रेम सिद्ध करण्यास
ना कॉपी होते ना पेस्ट
आपली स्वरचित रचनाच
होती आपली प्रामाणिक टेस्ट
तुझ्या माझ्या काळात
व्हिडिओ होता ना ऑडिओ
आपले कंठच होते दोघांचे
अप्रतिम सिंगिंग रेडिओ
हातात हात घालून फिरायला
ना टू व्हिलर ना फोर व्हिलर
समुद्रकिनारी बसून पहायचो
प्रत्येकाच्या प्रेमाचे ट्रेलर
फिरायला गेलो कुठेतरी
ना काढायचो सेल्फी ना पिक्स
आपल्या हृदयातच साठवायचो
आपले अस्मरणीय क्लिक्स

