तूच जीवनी
तूच जीवनी
क्षण रडवणारे खुप जरी
बघीतले या डोळ्यांनी
आलीस माझ्या तूच जीवनी
ओठ भरण्या हास्यांनी.........१
संकटाचे ओझे पेलवेना
धैर्य नव्हते या धमनी
हिमतीचे सुर गात गात
आलीस माझ्या तूच जीवनी......२
निराशेच्या वाटेवर होतो
भरकटलेल्या दिशांनी
होकायंत्र या जीवाचा बनली
निघालो आता सरळ मार्गांनी.......३
गोंजारले अशक्त शब्दांना
तिले बळ स्तुतीसुमनांनी
आलीस माझ्या तूच जीवनी
काव्यात जगतो तुझ्या वचनांनी......४

