STORYMIRROR

Pranjali Kalbende

Others

3  

Pranjali Kalbende

Others

सावित्रीबाई

सावित्रीबाई

1 min
274

सावित्रीबाईला

वंदन करू मानाने

आज त्यांच्या गं पुण्यतिथीला.....१


स्मरण करूया

कार्य क्रांतीकारी त्यांचे

कवने महतीची गाऊया.....२


सकलांची माता

ठरली महान जगी

शब्द संपत्ती महती गाता.....३


वंचितास माया

दिली आजन्म साऊने

पदरी घेतले सावराया......४


झटली माऊली

मुलींच्या उद्धारासाठी

आणली ज्ञानगंगा पाऊली.......५


घाव अन्यायाचे

सहन नाही केलेस

वाचले पाढे प्रतिकाराचे......६


शक्तीची देवता

होती ती सावित्रीबाई फुले

नाना हाल सोसले जगता......७


आदर्श महिला

या भुमीवरील एक

जगती मान तिचा पहिला......८


Rate this content
Log in