STORYMIRROR

Pranjali Kalbende

Others

4  

Pranjali Kalbende

Others

मुक्त आकाश

मुक्त आकाश

1 min
345

गवसले गतिमान पंख

उंच उंच आकाशी उडाले

मनी होत्या ज्याही इच्छा

पुर्ण करण्यास निघाले..........१

झेप घेता जरा कर्तृत्वाची

सारे आकाश माझे झाले

मोकळा श्वास घेण्यास

परीश्रम पुर्णत्वास आले.........२

लाथाडले जाचक रुढींना

बंड पुकारले आधुनिकतेचे

संधीचे सोने करीत करीत

स्वप्न साकारले समानतेचे.........३

माझ्या हिस्स्याचे आकाश

शोधले हिरीरीने व ताकदीने

नकळत नाद टाळ्यांचा झाला

आकाश निनादले मम किर्तीने.....४

मुक्त आकाशी फिरताना

जगण्यास नवदिशा मिळाली

बळ पंखात उमेदीने भरले

स्त्रीशक्ती पुढे पुढे सरसावली........५


Rate this content
Log in