मी स्त्री आहे म्हणून
मी स्त्री आहे म्हणून
1 min
437
मी स्त्री आहे म्हणून
सहनशीलता बाळगते
मानापमान कधी कधी
जाणूनबुजून विसरते....१
मी स्त्री आहे म्हणून
रांधते वाढते सदाकाळ
जबाबदारी पार पाडून
शोधते स्वतःचे आभाळ.....२
तक्रार नकार नाहीच
सदा तयार सेवेत
अपेक्षाही करू नये
वागवावे मला मायेत......३
निर्णायक भूमिकेत
नाही बघू शकत मला
कसोट्या पार केल्या
तरी विश्वास नाही संपादला.....४
मी स्त्री आहे म्हणून
रोज नवी नियमावली
कधी देणार हा समाज
लिंगभेदाला तिलांजली.....५
