STORYMIRROR

Pranjali Kalbende

Others

4  

Pranjali Kalbende

Others

महिला

महिला

1 min
466

महिला झाल्यात आज सक्षम

जिंकली लढाई त्यांनी अस्मितेची

जिद्द चिकाटीने धाव घेत घेत

गुढी उभारली बघा ही समतेची.....१

घाव झेललेत पूर्वी अगणित

रुढींच्या बेड्यांना केले मग दुर

अन्यायाला वाचा फोडीत

स्वाभिमान मिळविला भरपूर.....२

सर्व क्षेत्रात बनूनीया अग्रेसर

मान राखला हिंदू कोड बिलाचा

संविधानाने दिलेल्या अधिकारावर

गगनचुंबी महल बांधला कर्तृत्वाचा....३

नवे जग नव्या समस्या आल्या

घाबरली नाही तरीही महिला

काळाच्या प्रत्येक आघातावर

हजरजबाबी पवित्रा तिने राखीला......४

संकुचित मनोवृत्तीने सदैव

महिलेला दुय्यम दर्जा दिला

अपेक्षारहीत जीवन जगुन

खरा मान महिलेने मिळविला......५


Rate this content
Log in