वेळ
वेळ
1 min
288
फावल्या वेळात
छंद जोपासते
निवांत गावता
पुस्तके वाचते...१
वेळ हरवतो
किती लवकर
वाचनात मन
गुंते भरभर....२
जरी मी महीला
नटणे न रुचे
वाचन करणे
ऐवढेच सुचे....३
शब्दांच्या संगती
बसता एकांती
संवाद साधून
मीळे मना शांती....४
शब्द शब्द बोले
गं माणसापरी
पुस्तके आपली
मित्र आहे खरी....५
