स्त्री जन्म
स्त्री जन्म
1 min
251
एका चुकीच्या निर्णयामुळे
आयुष्य धुळीस मिळते
घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर
नारी मात्र ठाम असते......१
निवड जोडीदाराची जरी
ठरली असेल चुकीची
जबाबदारी स्वीकारत तिने
गती सावरली संसारगाडीची.....२
हतबल निराश शरीर होते
पण कडेवर असते लेकरु
परिस्थितीच्या सर्व यातनांना
माय म्हणते चल बाळा आवरु.....३
संसाराचा रगाडा एकटीने
बाळासाठी सहन करावा
आईच्या कुशीत वसलेले
बाळाने जणू तिला धीर द्यावा.....४
