तू
तू
तू जीवनाचा श्वास
तू मलमली आभास
तू दरवळणारा मोगरा
तूच माझ्यासाठी खास
तू माझ रुपेरी गाव
तू काळजाचा ठाव
तू मौन मनाचा शब्द
तू प्रत्येक शब्दाचा भाव
तू गंध भरला वारा
तू नभातील ओढाळ तारा
तू आष्यासम सोबत
तू हक्काचा किनारा
तू अर्थ जगण्याचा
तू क्षण हसण्याचा
तू हळवा मनमोहक
तू आधार चालण्याचा

