तू माझी होऊन जा
तू माझी होऊन जा
आज पुन्हा एकदा पुन्हा नव्याने तू माझी होऊन जा
जे काव्य होतं रचलं तुझ्यावर ते पुन्हा एकदा गावून जा.
स्पर्श तुझा या देहावर अजुनही तसाच आहे
लिहिलं होतं जे काव्य त्या ओठांनी या ओठांवर ते पुन्हा नव्यानं लिहून जा.
अजुनही मी तुझाच आहे स्वप्ननगरीतही माझ्या तूच असते
झाले पुरे स्वप्न अता सत्यातही माझ्या गावी कधीतरी तू येऊन जा.
पाऊसभरल्या सायंकाळी क्षितीजाला जे जवळ करते
सप्तरंगांनी न्हालेले ते इंद्रधनू तू होऊन जा
लिहिली होती जी तुला मी प्रेम पत्रे प्रेमात माझ्या
पडण्या प्रेमात पुन्हा तू फक्त एकदा ती वाचून जा

