STORYMIRROR

Writer Nishant

Action Inspirational

4  

Writer Nishant

Action Inspirational

तू जन्म घे पुन्हा ... बा भीमा !

तू जन्म घे पुन्हा ... बा भीमा !

1 min
372

बा भीमा ! तू दूरदृष्टी नेता होतास

स्वप्नात का होईना ये तू पुन्हा ...

ये उध्दरण्यास तो मानवता धर्म

आहोतच आम्ही तुझे सच्चे शिपाई


बा भीमा ! तू सांगितलेली पंच:सूत्री ...

न्याय ,स्वातंत्र्य ,समता, बंधुता ,, सहिष्णुता

आठवते तुझी शिका संघटित व्हा संघर्षांची हाक

आता सारं काही बिघडलय गड्या ये तू पुन्हा ....


बा भीमा ! तुझ्या नावावर जगणारी पिलावळ मतलबी झाली

अन त्यांनी आपल्या शत्रुपक्षाशीच संगनमत केलंय

काही आठवले , विसरले नको तिथे पसरले ...

युती , समरसतेच्या नावाखाली वाट्टेल तिथे लोळताहेत


बा भीमा ! तुझे कर्तृत्व तू दिलेली राज्यघटना प्रेरणादायी

गृहकलह आणि शत्रूंनाही तू पुरून उरला होतास पण ...

तुझ्या विचाराचे वारसदार कितीसे उरलेत ? इतिहास जमा झाले

कुणी षंढ निपजलेत , उरले सुरले आम्ही लढतोय कुवतीनुसार ....


बा भीमा ! म्हणून म्हणतो तू पुन्हा यायला हवं ...

क्रांतीच गीत गाण्या बळ दे आम्हा पुन्हा

स्वप्नात का होईना येऊन जा गड्या

गरज आहे तुझी तू जन्म घे पुन्हा ... बा भीमा ! स्वप्नात का होईना येऊन जा गड्या





Rate this content
Log in

Similar marathi poem from Action