सारं काही ठरल्याप्रमाणे ...
सारं काही ठरल्याप्रमाणे ...
सारं काही ठरल्याप्रमाणे ...
मतिमंद मी , गतिमंद तू
दोघे मिळुनी करूया कांड
मी भडकवितो दंगे तू रच कुभांड
सत्याची असत्याची कशाला चर्चा
मी तुझा आका, तू माझा पाळलेला बोका
मी करतो मारल्यासारखं तू कर रडल्यासारखं
खेळ आपला ठेवूया सुरु चालेल तोवर ....
खोटी खोटी स्वप्ने दावू अन
साम , दाम , दंड भेद लावू
विकू काही विकत घेऊ बिनधास्त
आपण सारे भाऊ भाऊ देश विकून खाऊ
फुटकी थाळी फाटकी झोळी
मोकळ्या मनाने देवघेव करू
चुचकारु कुणा , बिनधास्त मारू
अंध भक्तांची फौज चल उभारू
लाचार जनता , बहुरुपिया जगत्जजेता
मिडीया दलाल , जनता बेहाल तरीही
मी घेतो सोंगे तुम्ही व्हा तमासबीन चेले
सारं काही यथा अवकाश ठरल्याप्रमाणे ....
