अवघाचि संसार पुस्तकमय करू
अवघाचि संसार पुस्तकमय करू
वाचून - लिहून अक्षर - अक्षर
मिळुनी सारे होऊया की साक्षर
तू लिही पुस्तक कधी मी लिहीन गडे ...
आलटून - पालटून लेखक- वाचक होऊ
माझे पुस्तक तुला देईन तुझेही मग
आनंदाने घेईन वाचीन मनसोक्त ...
तुझे पुस्तक मला दे माझे पुस्तक तुला
पुस्तकांची देवाण- घेवाण करूया मस्त ...
पुस्तक पुस्तक जमवून सारे
पुस्तकच वाटू धन जण लोका
पुस्तकच देऊया भेट आता
पुस्तकांनीच भरुया घरदार ग्रंथालये
पुस्तकं वाचून मनात साठवून
मस्तक घडतील सुपीक सात्विक
द्वेष अहंकार भांडणतंटे संपून जातील
परस्परांची मने होतील नितांत सुंदर
चला गड्यानो आता एकच ध्यास धरू
गाव शहरं वाड्या वस्त्या शाळा महाविद्यालये
पुस्तक पुस्तक मिळून पुस्तकाचे जग साकारू
अवघाचि संसार पुस्तकमय करू ....
