दोस्ता ! नको करू रे व्यसन
दोस्ता ! नको करू रे व्यसन
पोर -सोर, गुरु- ढोरं उपाशी
गव्हाणीत चारा न घरात रेशन
नेत्याचं कोरडंच भाषण
दोस्ता ! नको करू रे व्यसन
ध्यानी घे रे तू संसार तुझा फाटका
कष्टानं कर त्याला आता नेटका
पदोपदी लुबाडणारेच तुला
तुझा तूच हो रे पाठीराखा
पिऊन दारू नको असा मरू
नको बायको- पोरास्नी मारू
नको थूंकूस खाऊन तंबाखू गुटखा
सोड रे तू व्यसन सारी शपथ तुला ...
नशीब नसत रे फुटकं कधी
तूच जीवनाचा शिल्पकार गड्या
कर संसार तू बघ नेटान जरा
जाण्या भवसागर हा तराया ....
रातीनंतर सोनेरी पहाट गड्या
तिमिरातुनी तेजाकडे जा तू बिनधास्त
कष्टाची भाकर खा अन खाऊ दे चिल्यापिल्याना
अवघाचि संसार तव सुखाचा होईल .....
