आम्ही चालवू पुढे वारसा ...
आम्ही चालवू पुढे वारसा ...
आम्ही चालवू पुढे वारसा ...
Kavi Nishant _
नाही कुणा कसली खंत ? ज्याला - त्याला पोटाचीच भ्रांत ...
लोकसंख्यावाढ ,महागाई ,बेकारी भ्रष्टाचार शिरला नखशिखांत
आपणच बनूया या देशाचे सुधारक नी भाग्यविधाते निःशंक
ऊठा मित्र ,मैत्रिणींनो जागे व्हा संविधान चळवळीचा धागा व्हा
संत, पंत, तंत वाड् :मयाचा थोर वारसा ,चित्र शिल्प कला संस्कृती
न्याय , स्वातंत्र्य समता बंधुता अन संधीची समानता आम्ही अंगिकारू
नानाविध भाषा प्रांत रंग रूप वेष जरी आम्ही संविधानप्रेमी सर्व भारतीयच
गंगा जमनी तहजीब ... हिंदू मुस्लिम शीख इसाई आम्ही सर्व भाऊ -भाऊ
संविधान शपथ ...धोतऱ्याच्या फुलांना टाळूया अन सुगंधी फुलांना माळुया
आम्ही सर्व भारतीय लोक आपापसांत कधी न भांडता एक होऊया
बलशाली सुजलाम सुफलाम भारत घडवण्या वेळप्रसंगी रक्तही सांडू
हे विश्वची माझे घर मानून जगात भारतीय म्हणून मानाने मिरवू
संविधान शपथ ! ऊठ मतदारा जागा हो ,संविधानाचा धागा हो ...
जातीपातीच्या तोडुनी भिंती,विसरुनी सारी व्यर्थ भ्रमंती
आशेच्या या क्षितिजावरती ,आकांक्षारूपी रूपी तारे विसावती
माणुसकीची जोडूया नाती ...फिनिक्ष होऊनि झेप घेऊया गगणावरती
शिवशाही - लोकशाही स्वराज्याकडून सुराज्याकडचा अमुचा प्रवास ...
शिवराय फुले शाहू आंबेडकर महात्मा गांधी नेहरू अब्दुल कलाम
जय जवान ,जय किसान हम सब भाई भाई जयभीम जयहिंद देऊ नारा
ज्ञात अज्ञात अमर शहिदांचे स्वप्न साकारण्या आम्ही चालवू पुढे वारसा ...
