STORYMIRROR

Savita Kale

Romance Others

3  

Savita Kale

Romance Others

तू हो माझी एकदा

तू हो माझी एकदा

1 min
293

स्वप्नात पाहतो

जागेपणी मागतो

तुझ्यासाठी रातदिन

किती मी झुरतो


मनात जागा तुला

माझ्या मी दिली गं

मला तुझ्या मनाच्या

कोपऱ्यात ठेव गं


नजरेत माझ्या तू

पाहशील कधीही

तुझीच छबी ती

दिसेल तुलाही


तुझीच आस मला

तुझाच भास सदा

तुझाच झालो मी

तू हो माझी एकदा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance