STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Abstract

3  

Sanjay Dhangawhal

Abstract

तू गेलास तर...

तू गेलास तर...

1 min
295

तू गेलास तर तुला विचारतील 

रिकाम्या हाताने येण्याचं कारण म्हणून तू खूप खूप फिरलास 

नाही कोणी भेटले तुला म्हणून 

मला घ्यायला आलास 


आजकाल खऱ्या माणसांना जगू देत नाही

आणि त्यांना कोणी विचारतही नाही

अरे एका लबाड माणसाच्या जन्मासाठी

तू खऱ्या माणसाचा शोध घेत होतास

फिरून फिरुन शेवटी माझ्या दारी आलास


खरंच सांगतो या माणसांच्या गर्दीत 

तुला प्रामाणिक कमी आणि बेईमानच जास्त दिसले असतील

कदाचित तुझ्यासोबत काही तरी सौदा करून 

मला घेऊन जाण्याचाही सल्ला देत असतील


अरे तू पाहिले असेल खऱ्यांना कोणी विचारत नाही 

कोणी आपले म्हणून घेत नाही

कोणाच्या हृदयातही खऱ्या माणसाला कुठेही जागा नसते 

फक्त खोटी सहानुभूती असते


प्रामाणिक राहुनही

खूप जखमा देतात 

सगळेच कसे काळजावर

घाव घालतात

माझ्या सज्जनतेचा पुरावा तर तुला सगळेच देतील

माझ्या बद्दल चांगलंच बोलतील


पण.....

मी मागणार नाही तुझ्याकडून 

मला घेऊन जाण्याचे आदेश पत्र

आणि तू आला आहेस तर खुशाल घेऊन जा

पण नेण्याआधी विचार त्या देवाला माझ्या जगण्याची मुदत किती शिल्लक आहे


खोट्या माणसांच्या जन्मासाठी खऱ्या माणसालाच का आणायचं हे ही विचारून घे 

नाहीतर माझी विनंती कळव त्या देवाला

खरी माणसं जन्माला

घालू नकोस

कुण्या आईचा गर्भ

शापित करू नकोस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract