तू बोलेना काही
तू बोलेना काही
तू बोले ना काही
तुझ्यात माझ प्रेम बोलत
कस सांगू तूला
तुझ्यात माझ मन बोलत...
उगीच तूला वेड्या सारखा पाहतो
उठता बसता तुझ्या आठवणीत राहतो
माझ मन निर्मळ तुझ्यापुढे खुलत....
तूच माझ्यासोबत छान दिसतेस
काय भारी तू तिरक हसतेस
पाहून तुझी अदा मन वाऱ्यासारख डुलत...
चढे माझ्यावर तुझ्या प्रेमाची नशा
माझ्या जगण्याची तूच आशा
तुझ्या लबाड गोष्टीत मन भूलत...
संगमच्या स्वप्नांची तू आहेस राणी
पाईप लाईनमध्ये लिहू आपली कहाणी
तूला मिळवण्यासाठी मन झुलत...

