तू आल्याने...
तू आल्याने...
नजरेत तुझ्या कसली जादू होती...
बघता क्षणी मी हरवून जात होती...
स्मृती तर जागेवर राहत नव्हती...
येवून जवळी तुझ्या...
सार दुःख तुला सांगाव...
पण हिम्मत मात्र होत नव्हती...
क्षण भर बसते विचार करते...
मलाच आहे का दुःख...
काही क्षण निघून गेले...
सुख माझ्या घरी पण आले...
कारण त्याचे मला ही कळले...
कारण सुख त्याच्या येण्याने बहरले...
तो आला माझ्या आयुष्यात अन् सर्वच बदलले...
आता न कसले दुःखाचे सत्र...
आता केवळ न केवळ सुख मात्र...
तुझ्या वाचून काही च नहीं रे माझे...
सुरवात पण तू अन् शेवट पण तूच...

