Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Abstract Tragedy

4  

Abasaheb Mhaske

Abstract Tragedy

तुमच्या लेखी आम्ही फक्त ...

तुमच्या लेखी आम्ही फक्त ...

1 min
242


तू गेलास पाठमोरा झालास तो कायमचाच

मी मात्र वाट पहिली तुझी इथे वेळी - अवेळी

तू तसा आलाच नाही, माझा झालाच नाही तरीही 

मी शोधते तुझ्या पावलांचे ठसे आजही... 


वेळेचं महत्व तुला कधी कळलंच नाही 

असा कसा रे तू भोळा सांब मी कुठे म्हटलं

हो ,नाही आणखी काही तूच ठरवून टाकलस

परस्पर अन मोकळा ही झालास जाण्यासाठी


मौनातही बरच काही दडलेल होत

एवढं देखील कळलं नाही तुला

चार पावलं मागे येऊन नि:शब्द मी

सार काही बिघडलं होत तरीही... 


तुला वाटलं मीच दोषी, स्वार्थी, संधीसाधू

आम्हा स्त्रियांना मुळी मन असत हेच मान्य नाही

खोट्या प्रतिष्ठा, मान,अहंकारास कुरवाळणाऱ्या

तुमच्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या वारसदारांना ...


तुमच्या लेखी आम्ही फक्त मादी , उपभोग्य वस्तू

फार - फार तर पाळीव प्राणी ,बिनपगारी दासी

समानतेच्या तुम्ही फक्त गप्पाच मारणार अन

वेळेवर प्रथा परंपरा किंवा आईबापाच्या मागे दडणार


Rate this content
Log in