STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

3  

Varsha Shidore

Inspirational

तुळस संस्कृती...

तुळस संस्कृती...

1 min
11K


तुळस आहे आरोग्यवर्धक

शुद्ध हवेचे शास्त्रशुद्ध प्रतीक 

घरोघरी शोभे विराजमान 

चैतन्याचे चिन्ह ते सात्विक... 


सायंकाळ होता परंपरेनुसार 

तुळशीपुढे दिव्याचा प्रकाश

लक्ष्मीचे आगमन होई घरात 

करण्यास सूडबुद्धीचा विनाश... 


तुळस मंजुळा अत्तर सुंगधित 

भोळ्या कृष्णास खूपच प्रिय

विठ्ठलाच्या वारीत भक्तांच्या 

डोईवर तुळस कळस शोभनीय... 


हिंदू परंपरेनुसार लावले जाई 

थाटामाटात लग्न या तुळशीचे 

दीपावलीनंतर पंधरा दिवसांनी 

हे सोहळे पार पडे पूजाविधीचे... 


बहू गुणांची पवित्र अशी तुळस

देई संदेश निरोगी आरोग्याचा 

कल्याणकारी गुणधर्म ती जपते

आयुर्वेदिक उपचार संस्कृतीचा... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational