STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

तुला सांगायचंय..

तुला सांगायचंय..

1 min
11.5K

तुला सांगायचंय मनातलं...

तुझ्या मनाशी एकरूप होऊन

प्रेम करतोय मी तुझ्यावर हे बोलायचंय 

तुझ्या नजरेत नजर घालून


ठाव घ्यायचाय तुझ्या मनाचा,

अगदी खोल शिरून...

पाहतोय मी तुला रोजच, 

आज पाहायचंय नजरेला नजर बांधून...


हो म्हटशील की नाही,

हे कदाचित सांगशील ठरवून

मी मात्र आलोय समोर तुझ्या 

मित्रांनी उसनी दिलेली हिंमत गोळा करून...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance