STORYMIRROR

UMA PATIL

Fantasy

2  

UMA PATIL

Fantasy

तुला पाहता पाहता

तुला पाहता पाहता

1 min
13.3K



पाहिले मी तुला तू मला पाहता पाहता

जाहलो बावरा मी तुझा चाहता चाहता


गाव मी सोडले दोन खोल्या घराच्या इथे

त्यास घरपण मिळे तू तिथे राहता राहता


एकमेकांमध्ये मिसळले रंग, पाणी जसे

स्वप्नवेडे दिसू लागले नाहता नाहता


शोधतो कन्यका देखणी तू जशी सुंदरी

सागराला नदी भेटली वाहता वाहता


ही अशी जीत अन् ही अशी प्रीत गं आपली

भार होऊ नये यौवना साहता साहता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy