STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Romance Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Romance Inspirational

तुजवीण कोण माझे

तुजवीण कोण माझे

1 min
238

तुजवीण कोण माझे?

सारे येथे परक्या परी

नाही कुणी सखा सोयरा 

तूच माझा हो लवकरी | | १| |


प्रेमळ तुझी छबी मला

मला जवळची वाटते |

तुला समीप पहाताच

समाधान अंतरी दाटते | |२| |


तुजवीण मला करमेना मुळी

जिकडे तिकडे तुझाच भास |

असतांना तुच संगती माझ्या 

का धरेन मनी इतरांची आस | |३| |


तुज माझा खरा जिवलग मित्र

तूच देतो मज सांत्वन खरे |

बाकी सारे स्वार्थाचेच पुतळे 

त्यांचे नाव न काढलेलेच बरे | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract