तुजवीण कोण माझे?
तुजवीण कोण माझे?
तुजवीण कोण माझे?
सारे येथे परक्या परी
नाही कुणी सखा सोयरा
तुच माझा हो लवकरी | | १| |
प्रेमळ तुझी छबी मला
मला जवळची वाटते |
तुला समीप पहाताच
समाधान अंतरी दाटते | |२| |
तुजवीण मला करमेना मुळी
जिकडे तिकडे तुझाच भास |
असतांना तूच संगती माझ्या
का धरेन मनी इतरांची आस | |३| |

