तुझ्याविना
तुझ्याविना
या थरथरत्या गात्रांनी पांघरले हे धुके
सजणी, तुझ्याविना होती, रंग सारे फिके
त्या अनोळखी वाटेवर
अशी भेट अचानक झाली
अबोल कलिके परी ती
कशी अवचित हसली गाली
जरी शब्द सभोवती माझ्या,
संवाद झाले मुके
सजणी, तुझ्याविना होती, रंग सारे फिके
कधी रात्रीला मज दिसते
ती नभीच्या तारांगणी
मी बोलविता मग येते
ती उतरूनिया अंगणी
जसे भेटण्यास धरतीला
आकाश खाली झुके
सजणी, तुझ्याविना होती, रंग सारे फिके
ती माझी अन् मी तिचा
हे तीच बोलली मला
मन बांधुन आले तेव्हा
त्या गगना वरती झुला
माझ्या पायाशी आली
ही गात गाणी सुखे
सजणी, तुझ्याविना होती, रंग सारे फिके

