STORYMIRROR

VINAYAK PATIL

Romance

3  

VINAYAK PATIL

Romance

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

1 min
221

तुझ्यात जीव गुंतला 

माझे मला कळले नाही

तुझ्या प्रेमात पडलो 

अप्रुप घडले काही ||१|| 


केले अनेक प्रयत्न 

प्रेमापासून दुरावण्याचे 

प्रत्येक क्षणी तुझ्यात हरवलो 

ना राहीले भान जगण्याचे ||२|| 


जाणीव वेड्या मनाची

तुझ्या काळजा झाली कशी 

फक्त होता एक इशारा

तू इतक्या जवळ आली कशी ||३|| 


रांगडा गडी मी हौसीबाज 

निरनिराळा मज ध्यास 

तुझ्यात जीव रंगला 

जीवा लागे फक्त तुझी आस ||४|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance