तुझ्याच प्रेमासाठी
तुझ्याच प्रेमासाठी
स्विकार माझी भेट
मनोहर तुझ्याचसाठी,
काळजातला खोपा सुंदर
फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी...
एकदा तरी आज माऊली
बघ मजला तू,
लाथ मारतो स्वर्ग सुखावर
फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी...
तू येण्याची जशी
लागली चाहूल मला,
शिंपडले मी घरात अत्तर
फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी...
आजपर्यंत जपले
माझ्या काळजात मी,
प्रेमाचे हे अडीच अक्षर
फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी....
राणीसारखी राहशील
तू घरात माझ्या,
घरी ठेवले नौकरचाकर
फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी...
हर एक युगात माझी
व्हावी तूच प्रियतमा,
सतयुग,कलयुग,व्दापरयुग आहे
फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी....
ऊन, थंडी न् पावसासाठी
मी जिवंत आहे,
फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी...

