तुझ्या स्वप्नाची दुनिया
तुझ्या स्वप्नाची दुनिया
तुझ्या स्वप्नाची एक दुनिया असावी
त्यात मला हक्काची जागा मिळावी
सुखदुः खाच्या विणलेल्या धाग्याने
संसाराची रेशमी नाती घट्ट व्हावी
आपुलकीचे त्यात अंगण असावे
दारात भावनांची रांगोळी असावी
चमचमणाऱ्या प्रीतीच्या तोरणाला
आधाराची निरंतर साथ मिळावी
सतत प्रेमाचा घरात वास असावा
स्वप्नाची दुनिया खूप छान दिसावी
राग, रुसवा थोडा असावा, पण
डोळ्यामध्ये अश्रूची धार नसावी
ओठावर आंनदाचे गीत असावे
सोबत गीताला तुज साथ मिळावी
स्वप्नाच्या दुनियेतील सारी स्वप्न
प्रत्यक्षात मग सारी खरी ठरावी
