तुझ्या बासरीचे सूर जुळले
तुझ्या बासरीचे सूर जुळले
बावरते कधी, सावरते कधी.
प्रित वेडी मी राधा तुझी.
तूच अंतरी वसलास मुरारी, मग
का समजत नाही व्यथा माझी
तुझ्या बासरीचे सूर जुळले,
या वेड्या राधेच्या ऱ्हदयाशी.
व्याकूळ होवूनी भटकत रहाते,
का खेळतोस असा माझ्या मनाशी
ध्यानी तू सदैव असतोस,
मनी तुझीच प्रतिमा असते
तुझ्या बासरीच्या नादावरती,
माझ्या पैंजनाचे घुँगरू वाजते
नदीचे दोन किनारे जरी, तरी
प्रित अंतरी सारखीच वहाते
त्याच सरितेच्या काठावरती,
राधा कृष्णाची वाट पहाते
तुझ्यासह तुझ्याविना

