पाऊस तुझा माझा.. आपल्या प्रेमाचा..!!🌧❤
पाऊस तुझा माझा.. आपल्या प्रेमाचा..!!🌧❤
- - - - - - - 1 - - - - - - -
तुझ रोखून बघण माझ्याकडे,
अन तुझा तो कटाक्षच न्यारा ।
मी अंतर्बाह्य भिजून जाते,
हाच पाऊस मज खूप प्यारा ।
- - - - - - 2 - - - - - - -
पाऊस तर माझ्या नशिबी ,
आहे रोजचाच ठरलेला ।
कधी तुझ्या कुशीत तर,
कधी त्या उशीत बरसलेला ।
- - - - - - - 3 - - - - - - -
मला पाऊस आवडतो,आणि
तुला पावसात भिजणारी मी ।
पण भिजताना पावसात नेहमीच वाटते,
तुला वाचेल माझ्या डोळ्यातही कुणी
- - - - - - - 4 - - - - - - -
पाऊस बाहेर ही आहे अन आत ही,
फरक फक्त इतकाच आहे सख्या ।
मेघ बरसताहेत वसुंधरेच्या मिलनासाठी
आणि डोळे बरसताहेत तुझ्या प्रेमासाठी ।
- - - - - - - 5 - - - - - - -
थेंब एक पड़ता अचानक,
सुगंधित झाली धरा अशी ।
व्याकुळ होती मिलनासाठी,
जन्मोजन्मीपासून वेडी जशी ।

