STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

4  

Abasaheb Mhaske

Romance

तुझ्या आठवणीने मी ही वेडा होतो

तुझ्या आठवणीने मी ही वेडा होतो

1 min
287

का कुणास ठाऊक का असं होत ?

तुझी आठवण , पावसाचं कोसळणं 

तू अन झिम्माड पाऊस दोघांनीही 

मन भरतं ना, जगणं थांबतं क्षणभर 


का कुणास ठाऊक का असं होत ?

तुझी सय अन पावसाचं भय 

अनिवार छळतात मज दोघेही 

येतात जातात आपल्याच मर्जीने 


का कुणास ठाऊक का असं होत ?

नाहीच समजलं कधी तुमचे नाते

तुमचे परस्परातील सारे लागेबांधे 

तुझी आठवण ,पावसाचे येणे जाणे 


का कुणास ठाऊक का असं होत ?

तुमचं अस्तित्व, भासही जीवघेणे 

तितकेच वाटते हवेहवेसे , लोभसवाणे 

तिचे हसणे ,गाणे अन तुझे बेधुंद बरसने 


का कुणास ठाऊक का असं होत ?

चार- चौघात माझं हासं होत 

मी होतो निशब्द जेंव्हा बोलताना 

हरवून जातो तुमच्या प्रेमात ...


दरवर्षी पाऊस येतो तुझी आठवण घेऊन 

गतकाळातील साठवण पुन्हा नव्याने 

तुझ्या स्नेहासिकत सानिध्याची ओळख 

अन तुझ्या आठवणीने मी ही वेडा होतो 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance