STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance Tragedy

4  

Sakharam Aachrekar

Romance Tragedy

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी

1 min
979

तुझ्या अंगणातल्या घनांना, पंख अनामिक लाभले

अंतर आपल्या बालपणातले, हलकेच वाढू लागले


अवखळत्या वयात जेव्हा भातुकली दूर गेली

वेल कोवळी सायलीची, अंगणी निसटून गेली

सांज आपल्या रम्य क्षणांची, आपल्यातून हरवून गेली

आता जगावे वाचून तुझ्या हे, एका ओळी सुचवून गेली

ऐन वसंता रानफुलांचे, बहर गळू लागले

अंतर आपल्या बालपणातले, हलकेच वाढू लागले


आपल्या रंगीत भेटींचा, मग अस्त सुरू झाला

हलकाच डोळ्यातून तुझ्या, आठवणींचा प्रेमबिंदू आला

तुझ्याशिवाय या रात्रींचा, वेग मंद झाला

तुझ्यावर लिहिण्याचा वेडा, छंद सुरू झाला

मन माझे एकांती, तुला शोधू लागले

अंतर आपल्या बालपणातले हलकेच, वाढू लागले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance