तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी


सांग ना तुझ्या आठवणीत
मी किती झुरु,
माझी सकाळ अन् संध्याकाळ
तुझ्या विचारांतच सुरू,
सांग ना तुझ्या आठवणीत
मी अजून किती झुरू....
पाहावे तिथे तुझाच चेहरा दिसे,
तुझ्याविना एक क्षणही न सरे
माझ्या मनात लागलंय
तुझंच अस्तित्व मुरु,
सांग ना तुझ्या आठवणीत
मी अजून किती झुरू....
तुझी वाट पाहून थकलाय माझा जीव,
मनाची माझ्या होतेय घालमेल
कर माझ्यावर थोडंसं तरी किव,
जीव लागलंय टांगणीला
तरीही प्रेम माझं सुरु,
सांग ना तुझ्या आठवणीत
मी अजून किती झुरू,
सांग ना तुझ्या आठवणीत
मी अजून किती झुरू....