STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

तुझी अन् माझी भेट पहिली...

तुझी अन् माझी भेट पहिली...

1 min
0

तुझी अन् माझी भेट पहिली ,

गोंधळलेली मी स्वप्न बावरी,

ओंजळ मनची भारावलेली,

फुलपाखरे तयाची उडणारी...

तुझी अन् माझी भेट पहिली...

या घडीला रंग चढली ,

क्षितीजाचे जणु रंग उतरूनी,

पावलांची ही कुजबूज कसली,

अडखळत जेव्हा सामोरी पडली...

तुझी अन् माझी भेट पहिली...

भासाची आज रांगोळी पुसली,

हूरहूर त्यावर अलगद टिपली,

क्षण होऊनी थेंब मनावर ,

सुखद मनाची माती ओलावली ....

तुझी अन् माझी भेट पहिली...

सावली माझी तुला बिलगली,

शहारलेली क्षण गोठली ,

हळूच धरता हाताने चंद्र ,

श्वास स्तब्ध अन् कविता झाली...

तुझी अन् माझी भेट पहिली...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance