तुझी आठवण येते
तुझी आठवण येते
पाहिले कुठलेही फुल की सुगंध साद देते,
डोळ्या समोर फुले आली की तुझी याद येते.
साधी असो नवीन जखमं भरून येते,
ह्दयाला दूःख झाले की तुझी याद येते,
दारा बाहेर बेल वाजली की जीव कासावीस होतो
तूच असशील म्हणून दरवाज्या कडे धावत येतो,
सूर्य मावळताना तुझी आठवण येते,
खोलीत मेणबत्ती पेटवताना तुझी याद येते,
