जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे
जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे
जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे
कधी गर्दी तर कधी एकांत आहे
आपले परके सगळ्यांसाठी सेम आहे
कधी slow तर कधी fast आहे
जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे...
ज्यांनी गाठला वेळेत हृदयाचा डब्बा
त्यांना काळजात जागा निश्चित आहे
बाकी वेळ साधू लोकांना
उभा टाकण्याइतकीच जागा शिल्लक आहे
जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे
कधी गर्दी तर कधी एकांत आहे
रोजचा प्रवास तसा सेम आहे
घरापासून सुरुवात ते दारापर्यंत थांबत आहे
जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे
कधी गर्दी तर कधी एकांत आहे
माझीही जिंदगी तशी आरक्षित आहे
माणुसकीच्या जातीतल्या प्रवाशांना
विचारशील first class आहे
बाकी विचारहीन प्रवाशांना
third class पर्यंत जागा ठीक आहे..
जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे
कधी गर्दी तर कधी एकांत आहे