धुंद पाऊस बेधुंद मी
धुंद पाऊस बेधुंद मी
तिच्या नाजुक कंबरेवर
पाऊस रेंगाळत होता
माझी मशागतीची नजर
डोळ्यांमधून तहान भागवीत होता
तिच्या ओल्या केसात
माझा जिव अडकला होता
तिच्या भिजलेल्या पाठीवरती हा कवी
शब्द शब्द पेरत होता
बोटांवरती बोट तिचे
पावसात फिरत होती
हातांवरच्या बोटांवरती
विज कडकडीत होती
काळ्या मातीत जसे
बीज उगवूनी यावे अगदीच...
तुझ्या पाठीवरती नखांनी हात
फिरवल्यानंतर
कविता माझी पालवी फुटून जन्म घेत होती...