STORYMIRROR

Shashikant Kendre

Romance

3  

Shashikant Kendre

Romance

डोळ्यांची नजर भेट...

डोळ्यांची नजर भेट...

1 min
287

खिडकीतून चक्क नजरेला नजर देत

डोळ्यांमधून जो संवाद सुरू होता

जणू पापण्यांच्या मधोमध डोळे तुझे

माझ्या डोळ्यासमोर येऊन डोळ्यांची भाषा

शिकवत होती...

तुझ्या खिडकी आड लपलेले डोळे

जेव्हा चोरून संवाद सुरू होता हे सारं माझ्यासाठी

विलक्षण होत होतं...


तुझ्या चाळीतील माझा दिवस पहिल्यांदा खूप

नकोसं वाटत होतं पण जेव्हा तुझ्या खेचक नजरेतून 

संवादा साधणाऱ्या डोळ्यांना पाहून

तुझ्या नजरेला नजरेची भेट झाली

अन् मी तुझ्यासहीत त्या चाळीचा दिवाना झालो


त्यामध्येच ईलाची वाला तुझा स्पेशल 

चहा जेव्हा ओठांवर येऊन सुगंध ठेऊन जात होता 

तेव्हा 

मनामध्ये तुझ्या भेटीचा संवाद रेंगाळून जात होता

ही दररोजची डोळ्यातली नजर भेट आणि तुझ्या हातचा चहा माझ्या प्रत्येक दिवसाला सुगंधीत करत होता


माझ्या कामावरील श्रद्धेत तुझ्यावर इतकी 

श्रद्धा कधी जडत गेली ते कळलंच नाही अगदी देवाच्या मंदिरावर फुल ठेवून 

श्रद्धा पूर्ण व्हावी अगदी अशीच तुझी नजर माझ्या 

मनातल्या गाभाऱ्याला प्रसन्नता देत होती..... 

तू आणि तुझी खिडकी आड लपलेली नजर

आणि तुझ्या हातांनी बनवलेला चहा खरंच खूप ग्रेट होता....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance