ती स्त्री..!
ती स्त्री..!
प्रत्येक संकटात लढा देते ती स्त्री
आई ताई माई असा काढा ओढते ती स्त्री..!!
दोन घरांतली वाट होते ती स्त्री
बायको प्रियसी मैत्रीण अशी सात देते ती स्त्री...!!
प्रत्येक घरातील चव होते ती स्त्री
खमंग खाद्यपदार्थासाठी अन्नपूर्णा होते ती स्त्री..!!
जन्मलेल्या प्रत्येक जिवाची पाहिली कुस म्हणजे ती स्त्री...!!
प्रत्येक जन्माच पहिल मंदिर म्हणजे ती स्त्री....!!
बाळांची बोबडी हाक होते ती स्त्री
आपल्या पिल्लाचां घास होते ती स्त्री...!!
प्रत्येक क्षणाला सोबतीला असते ती स्त्री...!!
आरसा देखिल नम्रपणे उभा असतो ती स्त्री....!!
घरातील लखलखत्या दिव्याची वात होते ती स्त्री
घराला घरपणाचं रूप देते ती स्त्री..
घराला घरपणाचं रूप देते ती स्त्री..!!