तुझे-माझे
तुझे-माझे
तुझे कोण माझे कोण
तुझा पाऊस माझे ऊन
तुझे कोण माझे कोण
तुझे सूर माझं गाणं
तुझे कोण माझे कोण
तुझे पीक माझं रान
तुझे कोण माझे कोण
विवंचनेत आपलं मन
तुझे कोण माझे कोण
हरविलेली काही क्षण
तुझे कोण माझे कोण
वेडे खुळे सारे जण
तुझे कोण माझे कोण
चकव्यात दोघं जण
तुझे कोण माझे कोण
तुझ्याविना मी कोण